उरुळी देवाची (पुणे) येथे गोवंशियांची हत्या, ५ धर्मांधांसह २ जणांवर गुन्हा नोंद !

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ७ गोवंशियांची सुटका !

प्रतीकात्मक चित्र

पुणे – ‘गोरक्षा सामाजिक संस्थे’चे पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय कांचन यांना ऋषीकेश कामथे यांच्याकडून माहिती मिळाली की, मंतरवाडी, उरुळी देवाची येथील किरण बनकर आणि सागर बनकर यांच्या मालकीच्या जागेत काही लोक बेकायदेशीरपणे गोवंशियांची हत्या करत आहेत. या माहितीच्या आधारे अक्षय कांचन यांनी आपले सहकारी गोरक्षक आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यातील पोलीस यांसह २० जूनला पहाटे ३ वाजता घटनास्थळी धाड घातली. पोलीस आणि गोरक्षक घटनास्थळी पोचले असता, तिथे अजिम पठाण, ख्वाजा हुसेन कुरेशी, रेहान कुरेशी, सादिक कुरेशी आणि मैनुद्दीन कुरेशी हे गोवंशियांची हत्या करत होते; मात्र पोलिसांची चाहूल लागताच हे पाचही आरोपी अंधाराचा अपलाभ घेऊन पळून गेले. घटनास्थळी एका देशी गायीची हत्या करण्यात आली होती. तिथे रक्ताने माखलेले मांस, कातडी आणि पाय विखुरलेल्या अवस्थेत आढळले. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

या ठिकाणी कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेल्या २ देशी गायी, २ जर्सी गायी, २ जर्सी गायींची वासरे, १ बैल अशा एकूण ७ गोवंशियांची सुटका करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही धर्मांध असे धाडस करतात म्हणजे त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. गोहत्या थांबवण्यासाठी केवळ गुन्हा नोंदवून न थांबता मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचणे आवश्यक आहे !