तमिळनाडूतील सी. जोसेफ विजय यांच्या सरकारचा अभिनंदनीय निर्णय
मंदिरांचा पैसा धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची घोषणा !

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने मंदिरांचे ४६ प्रकल्प रहित केले आहेत. या प्रकल्पांना मागील स्टालिन सरकारच्या काळात संमती देण्यात आली होती. सरकारने म्हटले की, मंदिरांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक अन् मंदिरांशी संबंधित पवित्र कार्यांसाठीच केला जाईल.
Temple Funds for Temples, Not Malls!
Joseph Vijay led Tamil Nadu's government has cancelled ₹246 crore worth of commercial complex projects that were to be built using temple funds and has announced that temple money will instead be used for religious activities.
A welcome… pic.twitter.com/AIc5EHhv4X
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
सरकारी आदेशात म्हटले आहे की, मागील द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकारने मंदिरांच्या पैशांतून विवाहासाठीचे २९ सभागृह आणि १७ व्यावसायिक संकुल बांधण्यास संमती दिली होती. या प्रकल्पांवर अनुमाने २४६ कोटी खर्च होणार होते; मात्र अद्याप या कामांना प्रारंभ झाला नव्हता. यामुळेच मंदिरांची आर्थिक स्थिती पहाता त्यांची संमती रहित करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागांतर्गत येणार्या मंदिरांच्या उत्पन्नाचा वापर विवाहासाठी सभागृह बांधणे, व्यावसायिक संकुल बांधणे आणि शैक्षणिक संस्था उभारणे, यांसाठी केला जात आहे; मात्र अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना याला विरोध करत होते. त्यांचे म्हणणे होते की, मंदिरांचे उत्पन्न केवळ मंदिरांची देखभाल, पूजा-पाठ आणि धार्मिक कार्य यांवरच खर्च व्हायला हवे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार