उद्यापासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ

मुंबई – महायुतीचे सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या कार्यपद्धतीत सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. सरकार सुधारणेच्या पलीकडे गेले आहे. अशा अपयशी सरकारसमवेत चहा पिणे शक्य नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. २२ जून या दिवशी चालू होणार्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २१ जून या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला चहापानासाठी निमंत्रित केले होते. विरोधी पक्षाने सरकारच्या अपयशाचे कारण देत चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे घोषित केला. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे भास्कार जाधव, सुनील प्रभु, अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते सतेज पाटील उपस्थित होते.

या वेळी भास्कर जाधव म्हणाले,
‘कोरड्या दुष्काळाची कल्पना असूनही सरकारने त्यासाठीचे नियोजन केले नाही. कांदा, आंबा, ज्वारी, बाजरी आदी पिकांना हमीभाव देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने कर्जमाफी घोषित केली आहे; मात्र यापूर्वी घोषित केलेल्या कर्जमाफीचे पैसे अद्याप शेतकर्यांना मिळालेले नाहीत. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रामध्ये फुटल्या, हे राज्याचे दुर्दैव आहे.’’
सतेज पाटील म्हणाले,
‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये १४ सहस्र पुरुषांना योजनेचा लाभ देणे, हे सरकारचे अपयश आहे. सरकारला कारभार करायला जमत नाही. भ्रष्टाचार, महागाई यांमुळे आंतरव्यवस्था कोलमडली आहे.’’
जयंत पाटील म्हणाले,
‘‘अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये महाराष्ट्राने प्रगती केली आहे. राज्यात असा एकही जिल्हा आढळणार नाही, जेथे अमली पदार्थांची विक्री होत नाही. अमली पदार्थविरोधी कारवाई करतांना मुख्य गुन्हेगारांना अभय देऊन वितरकांवर कारवाई केली जात आहे.’’
या वेळी सुनील प्रभु, जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारच्या विरोधात असंतोष व्यक्त केला.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !