इस्रायलकडून लेबनॉनवर होत असल्याच्या आक्रमणांमुळे घेतला निर्णय
तेहरान (इराण) – इराणने पुन्हा एकदा हॉर्मुझ सामुद्रधुनी (दोन जलाशयांना जोडणारा जलमार्ग) बंद करण्याची घोषणा केली आहे. इस्रायलकडून दक्षिण लेबनॉनमध्ये केल्या जात असलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे इराणकडून सांगण्यात आले आहे. ‘आक्रमणे अशीच चालू राहिली, तर यापुढील रणनीती ठरली आहे’, असेही इराणने म्हटले. यामुळे जागतिक इंधनपुरवठ्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर’ने नौकांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ न जाण्याची चेतावणी दिला असून ‘त्यांच्या सुरक्षेला धोका पोचू शकतो’, असे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.
अमेरिका-इराणमधील शांतता करारानंतर या आठवड्याच्या प्रारंभीच हा जलमार्ग पुन्हा उघडण्यात आला होता. यामुळे गेल्या अनेक महिन्यांच्या व्यत्ययानंतर तेल आणि इतर वाहतूक पुन्हा चालू झाली होती.
अमेरिकेने इराणचा हॉर्मुझ बंद केल्याचा दावा फेटाळला !
अमेरिकी सैन्यदलाने इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा फेटाळून लावला. ही महत्त्वपूर्ण जलवाहिनी उघडी असल्याचे आणि ती तशीच उघडी रहावी, यासाठी अमेरिकी सैन्यदल परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सैन्याने स्पष्ट केले.

UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani