ज्या दिवशी आपण निर्माता होऊ, त्या दिवशी आपण निर्णायकही होऊ ! – पंतप्रधान
कोलकाता (बंगाल) – येथील श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावर ३ स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या. देशातच रचना आणि उत्पादन केलेल्या या युद्धनौकांच्या समावेशामुळे देशाची क्षमता वाढणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या युद्धनौकांची निर्मिती भारतात झाली आहे. यासाठी भारतीय अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावले आणि परिश्रमही घेतले आहेत. ही नव्या भारताची सर्वांत मोठी शक्ती आहे. माझ्या शक्तीची ओळख जगाची बाजारपेठ बनण्यात नाही, तर माझ्या आत्मनिर्भरतेत आहे. भारताला निर्माता बनायचे आहे. ज्या दिवशी आपण निर्माता होऊ, त्या दिवशी आपण निर्णायकही होऊ.

युद्धनौकांची नावे एडवांस्ड स्टील्थ फ्रिगेट ‘आय.एन्.एस्. दूनागिरी’, सर्वे वेसल ‘आय.एन्.एस्. संशोधक’ आणि अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ‘आय.एन्.एस्. अग्रय’ अशी आहेत. या नौकांची रचना भारतीय नौदलाच्या ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ने केली असून कोलकाता येथील ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स’ने त्यांना बनवले आहे.
⚓ India’s Maritime Might Unleashed!
PM Modi officially commissioned 3 state-of-the-art indigenous warships, marking a giant leap for the nation's self-reliance at sea. 🇮🇳🌊
"No nation can become a major power without strong maritime capabilities," said PM Modi.… pic.twitter.com/ZDZyuW8m6M
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
१. आय.एन्.एस्. दूनागिरी : ‘ब्रह्मोस’सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज
ही युद्धनौका पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणार्या सुपरसोनिक क्षेपणास्त्र असलेल्या ब्रह्मोसने सुसज्ज आहे. यात हेलिकॉप्टर चालवण्याची क्षमता आहे. याची स्टेल्थ (गुप्त) तंत्रज्ञान शत्रूच्या रडारपासून वाचण्यासही साहाय्य करील.
२. आय.एन्.एस्. संशोधक : समुद्राचा नकाशा आणि सर्वेक्षण करील
आय.एन्.एस्. संशोधक युद्धनौकेचे कार्य युद्ध लढणे नाही, तर समुद्राचे सर्वेक्षण करणे आहे. किनारपट्टीवर आणि खोल समुद्रात ‘हाइड्रोग्राफिक सर्वेक्षण’, समुद्री डेटा संकलन आणि संरक्षण-नागरी वापरासाठी याची सिद्धता करण्यात आली आहे. हे समुद्राची खोली मोजू शकते. नकाशे म्हणजेच ‘नॉटिकल चार्ट’ सिद्ध करू शकते.
३. आय.एन्.एस्. अग्रय : शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्याची क्षमता
आय.एन्.एस्. अग्रय ही पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका आहे. हिला हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लाँचर आणि प्रगत सोनार प्रणाली यांनी सुसज्ज करण्यात आले आहे. यामुळे ती किनार्यांवर तैनात असलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना लक्ष्य करू शकते. तिला किनार्यांच्या संरक्षणासाठी तैनात केले जाईल. समुद्रात ये-जा करणार्या नौकांवर ती लक्ष ठेवेल.

ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक