धुळे येथे गुंडांकडून पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण : ३ आरोपी अटकेत !

अटक करण्यात आलेले आरोपी

धुळे – ग्रामीण रुग्णालयात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना गुंडांनी लाथाबुक्क्यांनी पुष्कळ मारहाण केली. हा प्रकार साक्री तालुक्यातील जैताने येथे घडला. या मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. पोलिसांवर आक्रमण करणार्‍या चौघांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून ३ आरोपींना कह्यात घेण्यात आले आहे, तर १ आरोपी सध्या पसार आहे.

१. ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री काही जण आपापसांत वाद घालत होते. हे समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन ‘वाद घालू नका’, असे सांगितले.

२. या वेळी संशयितांनी पोलिसांशीच हुज्जत घातली. ‘आम्ही तुमचे स्थानांतर करू’, अशी धमकी देत त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस गुंडांपासून जनतेचे रक्षण कसे करणार ?