
नवी देहली – केंद्र सरकारने १६ प्रकारच्या ‘फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन’ (मिश्र औषधे) यांचे उत्पादन, विक्री आणि वितरण यांवर तात्काळ प्रभावाने पूर्ण बंदी घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्या’च्या कलम २६ए अंतर्गत हा आदेश दिला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेण्यात आला.
🚫 Central Government Bans 16 Fixed-Dose Combination Drugs
Several drug combinations containing Paracetamol, Amoxicillin, and certain skin-treatment medicines have been banned after health experts flagged them as unsafe.
The move aims to protect public health and curb the use… pic.twitter.com/pkbCLbDv5v
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
ही औषधे आजार बरी करण्यासाठी फारशी प्रभावी तर नाहीतच, उलट त्यांच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे ही बंदी घालण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ‘ड्रग्ज टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डा’ने एका तज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने ‘क्लिनिकल डेटा’ आणि औषधांच्या परिणामांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर ही १६ मिश्र औषधे रुग्णांसाठी निरुपयोगी आणि हानिकारक असल्याचे सांगत ती बाजारातून त्वरित हटवण्याची शिफारस केली.
बंदी घालण्यात आलेल्या १६ औषधांची नावे
१. ॲसिटिल सैलिसिलिक ॲसिड + इथोहेप्टाझिन
२. कोरफड अर्क ॲलेंटोइन अल्फा टोकोफेरोल ॲसिटेट डी-पॅथनॉल व्हिटॅमिन ए
३. कोरफड अर्क व्हिटॅमिन ई डायमेथिकोन + ग्लिसरीन
४. कोरफड + जोजोबा ऑइल + व्हिटॅमिन ई
५. कोरफड ऑरेंज ऑइल
६. कोरफड जोजोबा ऑइल गव्हाचे तेल + टी ट्री ऑइल
७. कोरफड + व्हिटॅमिन ई हर्बल मिश्रण
८. डायसायक्लोमाइन पॅरासिटामॉल क्लिडिनियम ब्रोमाइड
९. डायसायक्लोमाइन पॅरासिटामॉल क्लिडिनियम ब्रोमाइड क्लोर्डियाझेपॉक्साइड
१०. ग्लाइक्लाझाइड + क्रोमियम पिकोलिनेट
११. पॅरासिटामॉल लिग्नोकेन
१२. अमोक्सिसिलिन सेराटिओपेप्टिडेज लॅक्टोबॅसिलस स्पोरोजेन्स
१३. अमोक्सिसिलिन क्लोक्सासिलिन लॅक्टिक ॲसिड बॅसिलस सेराटिओपेष्टिडेज
१४. अमोक्सिसिलिन सेराटिओपेप्टिडेज
१५. सेफाड्रॉक्सिल + प्रोबेनेसिड
१६. सेफुरॉक्सिम + सेराटिओपेष्टिडेज
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले