न्यायालयाने समन्स आणि वॉरंट बजावूनही प्रकाश राज यांच्याकडून दुर्लक्ष

बेंगळुरू – बहुभाषिक अभिनेते प्रकाश राज यांच्यावर एकाच नावाने ४ मतदार ओळखपत्रे मिळवल्याचा आरोप असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.
१. दिलीप कुमार नावाच्या व्यक्तीने प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीनंतर बेंगळुरू दंडाधिकारी न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट काढले. प्रकाश राज यांनी एकाच नावाने ४ मतदार ओळखपत्रे मिळवल्याचा आरोप दिलीप कुमार यांनी केला आहे.
२. यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते.
३. दोनदा समन्स आणि दोनदा अजामीनपात्र अटक वॉरंट काढूनही प्रकाश राज न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने तिसर्यांदा त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.
४. प्रकाश राज यांच्यावर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि तामिळनाडू या ४ राज्यांत अवैधपणे मतदार ओळखपत्रे बाळगल्याचा गंभीर आरोप आहे. राज्यघटनेनुसार कोणत्याही व्यक्तीला देशाच्या कोणत्याही भागात केवळ एकच मतदार ओळखपत्र बाळगण्याची अनुमती आहे; मात्र अभिनेते प्रकाश राज यांनी ४ राज्यांत मतदार ओळखपत्रे मिळवल्याचे म्हटले जात आहे.
५. समन्स आणि वॉरंट यांकडे दुर्लक्ष करून न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने प्रकाश राज यांच्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !
मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा बालेकिल्ला असणार्यांनी आम्हाला शिकवू नये ! : India’s Ministry of External Affairs
Trinamool Congress Bank Accounts : तृणमूल काँग्रेसची तीन बँक खाती गोठवली !