आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लव्ह जिहाद या विषयावर ऑनलाईन विशेष व्याख्यानाचे आयोजन !

श्री. मनोज खाडये

सातारा, ३० जुलै (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ३० जुलैच्या रात्री ९ ते १० या कालावधीत होणार्‍या या व्याख्यानात श्री. मनोज खाडये हे लव्ह जिहाद एक भीषण समस्या आणि उपाय या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारी हिंदु युवती, माता-भगिनींची होणारी फसवणूक, फसवणुकीसाठी धर्मांधांकडून उपयोगात आणण्यात येणार्‍या विविध युक्त्या, आतापर्यंत लव्ह जिहादला बळी पडलेल्या युवतींची संख्या तसेच यांवर कोणती उपाययोजना करू शकतो ? यांविषयी श्री. मनोज खाडये हे विस्तृतपणे मार्गदर्शन करणार आहेत. तरी अधिकाधिक धर्माभिमानी हिंदूंनी फ्री कॉन्फरन्स कॉल या अ‍ॅपवर ramseva01 या लिंकवर जोडावे. तसेच यू ट्यूबच्या https://youtu.be/mNZB1FRyT6A या लिंकवर जाऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे