देहलीतील चिनी दूतावासाने आयोजित कार्यक्रमात भारतातील साम्यवादी पक्ष, द्रमुक आदींचे नेते सहभागी !

चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम !

  • शत्रूराष्ट्राच्या दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रवादी नागरिकांनी वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !
  • भारतातील साम्यवाद्यांनी चीनला भारताविरोधी कारवायांत नेहमीच साहाय्य केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांचे नेते अशा कार्यक्रमात सहभागी होण्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! अशा पक्षांवर आता बंदी घालण्यासाठी सरकारने विचार करणे आवश्यक !
चीनचे राजदूत सुन वीडांग

नवी देहली – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने भारतातील देहलीस्थित चिनी दूतावासाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात भारतातील कम्युनिस्ट पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) आणि अन्य काही पक्ष यांचे काही नेते सहभागी झाले होते. यात माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा, खासदार डॉ. एस्. सेंथिलकुमार, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे के.जी. देवराजन् आदींचा समावेश होता.

(म्हणे) ‘चीन आणि भारत यांनी एकमेकांसाठी अडथळा न ठरता पूरक बनावे !’ – चीन

या कार्यक्रमाच्या वेळी चीनचे राजदूत सुन वीडांग यांनी ‘भारत आणि चीन शत्रू नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या यशस्वीतेसाठी अडथळा न बनता पूरक बनले पाहिजे’, असे वक्तव्य केले. (विश्‍वासघातकी चीनच्या या बोलण्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)

गलवान खोर्‍याचा उल्लेख करतांना वीडांग म्हणाले की, चीनने प्रत्येक वेळेला स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. (स्वतःची भूमिका म्हणजे ‘आम्ही चुकीचे नव्हतो, तर भारताने चूक केली’, असेच सांगण्याचा चीनने आतापर्यंत प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय नेत्यांसमोर खोटेपणा करणार्‍या चीनला या नेत्यांनी खडसावले का नाही ? – संपादक)