लसीचे कूपन वाटण्यावरून संभाजीनगर येथे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी !

राजकीय पक्षांकडून दायित्वाने वागणे अपेक्षित आहे !

राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

संभाजीनगर – येथील महापालिकेच्या विजयनगर आरोग्य केंद्रात लसीचे कूपन वाटण्यावरून झालेल्या वादात माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह काही शिवसैनिकांनी भाजपचे ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद केंद्रे यांना २६ जुलै या दिवशी मारहाण केली. यात केंद्रे घायाळ झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मारहाण करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.