‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’ यांच्या वतीने महापुरामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांना साहाय्य !

सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक साहित्याचा संच देणार !

सातारा, २५ जुलै (वार्ता.) – छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने अतीवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या चिपळूण, कोल्हापूर, सांगली, सातारा, महाड, पोलादपूर आदी ठिकाणच्या नागरिकांना विविध साहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’चे संस्थापक अध्यक्ष प्राणजितभाऊ गवंडी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘महापुरामुळे अनेक कुटुंबे प्रभावित झाली असून काही ठिकाणी दरडी कोसळून कुटुंबे ढिगार्‍याखाली अडकून मृत्युमुखी पडली आहेत. अशा नागरिकांना साहाय्य करणे, ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. यामुळे छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने प्रभावित क्षेत्रांना विविध साहाय्य देण्यात येणार आहे. यामध्ये ५ किलो पीठ, ५ किलो तांदूळ, तेल पिशवी, मीठ, साबण, दंतमंजन, मेणबत्ती, काडेपेटी आदी गृहोपयोगी वस्तू आणि कपडे, पिण्याचे पाणी, बिस्किटे, सुका खाऊ आदी जीवनावश्यक साहित्याचा संच देण्यात येणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन साहाय्य करावे. पूरग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी ९८०४२ ७२५२५ किंवा ९१४६२ ७२५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’