पंतप्रधान मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा !

आषाढी एकादशी

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीतून ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे, अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचे उदाहरण असून समानता आणि एकता, यांवर भर देणारी आहे.