‘पंढरपूरला पंढरी, पांडुरंग, पंडरीपूर, फागनिपूर, पौंडरिकक्षेत्र, पंडरगे, पांडुरंगपल्ली इत्यादी नावे निरनिराळ्या काळात दिली असावीत. ‘पौंडरिक’ हे नाव ‘पंडरिका’ या नावावरून बनले. ‘पंडरिपूर’ या शब्दातून पंढरीचे ‘पंढरपूर’ नाव बनले असावे. याचे कन्नड आणि संस्कृत भाषेत नाव ‘पंडरिका’ असे होते. ‘पंडरिका’ किंवा ‘पंडरगे’ यापासून ‘पंडरी’ किंवा ‘पंढरी’ असा शब्द झाला. ‘पांडु’ म्हणजे पांढरे गंध लावले जाणारे देवाचे रूप ! देवाचे सुंदर ध्यान !

१. पंढरपूर हे ‘भागवत धर्माचे आद्यपीठ’ म्हणून ओळखले जाते.
२. पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलमूर्तीची वैशिष्ट्ये
अ. पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलमूर्ती प्रतिष्ठापित असल्यामुळे ती अचल आहे. ती ध्रुवघेर (अढळ) आहे. ती ‘समचरण विटेवरी’ अशा पद्धतीने ताठ उभी आहे.
आ. तिचे हात कटीस्थित असून तिच्या हाती शंख आणि उजव्या हातात कमलपुष्प आहे.
इ. ही मूर्ती द्विभंगात आणि त्रिभंगात अलिढ (डावा किंवा उजवा पाय पुढे ठेवून योद्ध्यासारखी उभी मुद्रा) वा प्रत्यालिढ (त्याच मुद्रेची उलट दिशा) आसनात उभी नाही कि अभय-वरादी हस्तमुद्रा (देवतेच्या हातांमधून दिसणार्या अभय, वरदान आणि इतर आध्यात्मिक भाव व्यक्त करणार्या हस्तमुद्रा) येथे आढळत नाहीत. तसे असते, तर ‘मूर्तीची हालचाल अभिप्रेत होती / आहे’, असे अनुमान करावे लागले असते.
ई. येथील श्री विठ्ठल ताठ उभा असून हातही कटीवर स्थिर आहेत. अशा प्रकारच्या अवस्थेचे कवी कुलगुरु कालिदासांच्या शब्दांत ‘निर्वात निष्कंपमिव प्रदीप’ (वारा नसलेल्या ठिकाणी ठेवलेल्या दिव्याच्या स्थिर ज्योतीप्रमाणे) असे वर्णन करता येईल.
उ. श्री विठ्ठलाने डाव्या हाती धरलेला शंख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. उजव्या हाती असलेले कमळ हे पावित्र्याचे प्रतीक आहे. ज्ञान आणि पावित्र्य हे योग्याजवळ असले पाहिजे.
ऊ. श्री विठ्ठलाला दोनच हात आहेत; कारण त्याला त्या रूपात चक्र आणि गदा या आयुधांची आवश्यकता नाही.
ए. भक्तीप्रेमाची विठुमाऊली २८ युगे प्रेमाचा नुसता वर्षाव करत आहे. भक्ताच्या भेटीसाठी तो वाट पहात आहे.’
– ज्योतिषी चिंतामणी देशपांडे (जुलै २०१९)
२५ जुलै : देवशयनी एकादशी
पालखीमार्गातील काही गावांचा आध्यात्मिक अर्थ !
विठ्ठल : इतिहास, मूर्तीशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र
‘भेटीलागे जीवा, लागलीसे आस ।’
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
विठ्ठल : एक महासमन्वय !