देमचुक (लडाख) येथे दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करणार्‍यांचा चिनी सैन्याकडून फलक दाखवून निषेध

भारताचा आणि भारतियांचा विरोध दर्शवण्याचा सतत प्रयत्न करणारा चीन !

नवी देहली – तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याच्या रागातून चीनच्या सैन्याने लडाखमधील देमचुक येथील सीमेवर विरोध दर्शवण्यासाठी फलक दाखवले आणि चिनी झेंडे फडकावले. या वेळी चिनी सैन्यासह त्याचे काही नागरिकही उपस्थित होते. ही घटना ६ जुलै या दिवशी घडली आहे. या दिवशी देमचुकमधील स्थानिक नागरिक दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ वर्षीय दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच दलाई लामा यांच्याशी दूरभाषवर बोलणे झाल्याचे सांगितले होते. दलाई लामा हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतील, असे सांगण्यात आले आहे.