
सांगली – ३० जूनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड फेकून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हे आक्रमण राजकीय हेतूने प्रेरित असून दडफेक करणार्या तरुणाला आणि ज्यांनी प्रेरित केले त्यांचे अन्वेषण होऊन त्यांनाही अटक करावी, या मागणीचे निवदेन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी हे निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई शेळके, महिला उपाध्यक्ष सविताताई मदने, प्रदेश सदस्य ज्योती कांबळे, प्रदेश सदस्य सौ. स्मिता पवार, प्रदेश सदस्य जयगोंडा कोरे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोतदार, सरचिटणीस उदय बेलवलकर, युवा अध्यक्ष राहुल माने, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद वळकुंडे, दादा रूपनर, नाना मगदूम इत्यादी उपस्थित होते.
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती