सातारा येथील ‘सराह लीना स्कूल’ची मान्यता रहित

शिक्षण विभागाचे आदेश


सातारा, १ जुलै (वार्ता.) – बालकांचा विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ यामधील तरतुदीनुसार सातारा येथील ‘लेडीज एज्युकेशन सोसायटी’ संचालित ‘सराह लीना स्कूल’ या शाळेची मान्यता रहित करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

‘सराह लीना स्कूल’ या शाळेविषयीच्या तक्रारींच्या अनुषंगाने खुलासा देण्याविषयी कळवण्यात आले होते. संस्थेने शिक्षण विभागाकडे खुलासा सादर केला; मात्र तो असमाधानकारक असल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळेची चौकशी करण्यासाठी तपासणी समिती गठीत केली. तपासणी समितीचा अहवाल, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा अहवाल आणि पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालक यांच्या अहवालाच्या एकत्रित निष्कर्षावरून ‘सराह लीना स्कूल’ या शाळेची मान्यता रहित करण्यात आली आहे.