‘जामखेड (जिल्हा नगर) येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अनेक वर्षांपासून असलेल्या फलकावर मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी आक्षेप घेतला आहे. फलकावर न्यायालयाचा ‘न्यायमंदिर’ असा उल्लेख आहे. यात पालट करण्याची मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, नगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, तसेच जामखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.’