कोरोनामुळे भारत उद्ध्वस्त झाला ! – डोनाल्ड ट्रम्प

कोरोना हा ‘चिनी विषाणू’च असल्याचे सूतोवाच

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – कोरोना हा ‘चिनी विषाणू’च आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे भारत उद्ध्वस्त झाला आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरवल्यासाठी चीनने जगाला हानीभरपाई दिली पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. चीनने अमेरिकेला हानीभरपाई म्हणून १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (अनुमाने ७४१ लाख कोटी रुपये) देण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.