काश्मीर येथील मंसूर अहमद याच्याकडून अमली पदार्थ कह्यात : हणजूण येथे कारवाई

  • अल्पसंख्य मुसलमान गुन्हेगारीत बहुसंख्य !
  • दळणवळण बंदीच्या काळात त्याच्याकडे हे पदार्थ कसे आले, याचीही चौकशी व्हावी !  

पणजी, ५ जून (वार्ता.) – गुन्हे अन्वेषण विभागाने काश्मीरस्थित अमली पदार्थ व्यावसायिक मंसूर अहमद याच्याकडून हणजूण येथे पार्ट्यांमध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचेे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने ४ जूनच्या रात्री प्रेसवाडा, हणजूण येथे धाड घालून ही कारवाई केली. या वेळी मंसूर अहमद याच्याकडे गांजा, चरस, एक्स्टसीच्या गोळ्या, कोकेन आणि ‘एल्.एस्.डी.’ हे अमली पदार्थ सापडले. मंसूर अहमद हा हणजूण येथील काश्मिरींच्या दुकानांमध्ये काही काळ काम करत होता आणि पर्यटकांना अमली पदार्थांचा पुरवठा करत होता.