इंटरनेटचा अतीवापर केल्यामुळे तरुणांना ‘नेटब्रेन’ या नवीन रोगाने ग्रासणे !
‘सध्या सर्वत्र इंटरनेटचा वापर इतका वाढलेला आहे की, लोकांचे परस्परांना भेटण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा ॲन्ड्रॉइड ॲॅप्लिकेशन, व्हॉटस्-ॲप यांसारख्या माध्यमांचा वापर करून अनेकजण एकमेकांच्या संपर्कात रहातात; परंतु सर्वांचे प्रिय ‘इंटरनेट’ सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय बनलेला आहे. इंटरनेटचा अती वापर केल्यामुळे समाजात मानसिक विकारांचे प्रमाण पुष्कळ वाढलेले आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील सुमारे २० कोटी लोकांना इंटरनेटच्या अनावश्यक वापराची वाईट सवय लागलेली आहे. यांत सर्वांत अधिक प्रमाण तरुणांचे असल्यामुळे ते ‘नेटब्रेन’ नावाच्या नवीन व्याधीने ग्रासित होत आहेत. या व्याधीमुळे व्यक्ती समाजापासून दूर जाणे आणि मानसिक स्तरावर अस्थिर होणे अशा मानसिक अन् सामाजिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.’
– (संदर्भ : मासिक ‘समाज प्र्रवाह’, १५ जुलै, २०१५)