भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणे अशुभ समजले जाते. ते दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या भोवतालचे रज-तम वाढून काळ्या शक्तीचे आवरण वाढते आणि वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुद्दामहून फाटके कपडे घालून भिकार्यांसारखे वावरणे हा कपाळकरंटेपणा नव्हे तर दुसरे काय ?
फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स परिधान करणारी भारतातील नतद्रष्ट युवा पिढी !
फाटलेले कपडे परिधान करण्याची टूम (फॅशन) झपाट्याने प्रचलित झाली आहे. ‘जीन्स’ कापडाची फाटलेली विजार घातलेले तरुण-तरुणी शहरासारख्या ठिकाणी हमखास पहायला मिळतात. सध्या तर याचे प्रमाण इतके वाढले आहे की, मुंबईत ‘जीन्स’ची विजार घातलेल्या प्रत्येक ३ व्यक्तींपैकी एकाची विजार ही फाटलेल्या कापडापासून बनवलेली असते किंवा ती बनवल्यानंतर फाडलेली असते. याची लागण ग्रामीण भागातही लागली आहे. लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानातही या ‘रिप्ड जीन्स’ चढ्या किंमतीत मिळू लागल्या आहेत.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.