१. पत्नी सेवेत व्यस्त असतांना घरच्या कामात साहाय्य करणे आणि तिला दायित्व घेऊन सेवा करण्यास प्रोत्साहन देणे
‘ऑनलाईन सत्संग सेवक म्हणून सेवा करतांना ‘अभ्यासवर्ग, सत्संग घेणे, आढावा पाठवणे’, अशा अनेक सेवांमध्ये मी व्यस्त असायचे; पण त्याविषयी त्यांनी कधीही गार्हाणे केले नाही.
पहाटेच्या वेळी मी नामजप करत असतांना ते सासूबाईंना चहा करून देणे इत्यादी कामे करत. मी सत्संग घेत असतांना ते मुलांना घेऊन नामजप करत असत. त्या वेळी घरातील काही कामे, उदा. भांडी लावणे, पाणी भरणे व्हायची राहिली असल्यास मुलांच्या साहाय्याने कामे पूर्ण करत. ‘तू दायित्व घेऊन सेवा कर. मी तुला साहाय्य करतो. घरातल्या कामांची काळजी करू नकोस’, असे ते नेहमी म्हणायचे. ऑनलाईन सत्संगासाठी नेटची पुष्कळ अडचण असायची. तेव्हा आर्थिक चणचण असूनही त्यांनी मला तत्परतेने नवीन सिमकार्ड घेऊन दिले.
२. साधकांशी बुद्धीच्या स्तरावर बोलण्याऐवजी भावाच्या स्तरावर प्रयत्न करण्यास सांगणे
काही वेळा साधकांशी बोलतांना माझ्याकडून बुद्धीच्या स्तरावर प्रयत्न होत. एकदा माझे साधकांशी बोलणे झाल्यावर ‘तू बुद्धीच्या स्तरावर प्रयत्न करतेस. भावाच्या स्तरावर प्रयत्न केलेस, तर ते अधिक परिणामकारक होईल’, हे त्यांनी माझ्या लक्षात आणून दिले.
३. कुलदेवतेचे पूजन भावपूर्ण करणे आणि नवरात्रात उपवास करणे
आमच्या देवघरात कुलदेवी श्री महालक्ष्मीचा तांदळा आहे. त्याचे पूजन ते भावपूर्ण करत. त्यांना नवरात्रात फुलांची आरास करणे इत्यादींमध्ये रुची होती. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करण्यापूर्वी ते प्रतीवर्षी नवरात्रात नऊ दिवस निराहार रहात.
४. व्यवसाय करतांना ‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असा भाव असणे
बांधकाम व्यवसायाच्या अंतर्गत काम पहायला जातांना, कामाची बोलणी अंतिम करतांना किंवा प्रत्यक्ष काम पूर्ण करतांना ते प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून जात असत. कामांच्या ठिकाणी (साईटवर) ते ‘प.पू. गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, असा भाव ठेवत. गेल्या वर्षभरात त्यांचे भावाच्या स्तरावरील प्रयत्न पुष्कळ वाढले होते.
५. संपर्कात येणार्या सर्वांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगून त्यांचे वितरण करणे
व्यवसायाच्या संदर्भात घरमालक, कंत्राटदार, बांधकाम साहित्य वितरक किंवा सहकारी यांच्याशी चर्चा करतांना सात्त्विक उत्पादने आणि कार्य यांविषयी ते आवर्जून सांगत. त्यांनी उत्पादनांची मागणी केल्यास तत्परतेने ती पूर्ण करत असत.
माझ्या सासूबाईंना १ – २ वेळा यवतमाळ येथील एका रुग्णालयात भरती केले होते. तेथे ते सात्त्विक उदबत्ती लावत. उदबत्तीच्या सुगंधाकडे आकर्षित होऊन तेथील परिचारिका, परिचारक आणि अन्य रुग्णांचे नातेवाईक उदबत्तीच्या संदर्भात विचारायचे. तेव्हा यजमान सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व आणि लाभ समजावून सांगत. ते दर पंधरवड्याला त्यांना सात्त्विक उत्पादनांचे वितरण करत. प्रतिवर्षी भाद्रपद मासात आम्ही
गौरी-गणपतीसाठी नागपूर येथील आमच्या घरी जातो. संपूर्ण कुटुंब तेथे एकत्रित होते. तेथे जातांना ते न चुकता सनातनची उत्पादने आणि पंचांग यांचे वितरण करण्यासाठी सोबत घेत असत.’
– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे (पत्नी), यवतमाळ (२६.५.२०२१)
सर्वांशी जवळीक असणारे आणि कुटुंबियांचा कणा असणारे कै. रवींद्र देशपांडे !१. आपलेपणाची आणि आदराची वागणूक देणे ते माझ्याशी कधी जावई म्हणून वागले नाहीत. त्यांनी मला नेहमीच आपलेपणाने आणि आदराने वागणूक दिली. २. इतरांना आपलेसे करून घेणे त्यांच्यातील सर्वांत मोठा गुण म्हणजे इतरांना आपलेसे करून घेणे. नवीन व्यक्तीला ते पहिल्याच भेटीत आपलेसे करून घेत. त्यामुळे अनेक क्षेत्रांतील आणि सर्वच थरांतील लोकांशी त्यांचा परिचय होता. ३. इतरांना साहाय्य करणे इतरांना साहाय्य करणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. स्नेही किंवा नातेवाईक यांचे कुठेही कोणतेही काम अडले किंवा काही गुंतागुंतीची कामे असली की, सर्वांना श्री. रवींद्र यांची आठवण व्हायची. अनेकदा त्यांच्या नुसत्या भ्रमणभाषवरून बोलण्यानेही बरीचशी कामे होत असत. ते सतत उत्साही असायचे. ४. आजच्या कलियुगात सर्वत्र विभक्त कुटुंबपद्धत बोकाळली असूनही देशपांडे कुटुंबाने एकत्र कुटुंबपद्धत जोपासली होती. ५. कुटुंबियांचा कणा असणे आई, दोन बहिणी आणि एक भाऊ अशा त्यांच्या कुटुंबियांचा जणू ते कणाच होते. कोणताही अडीअडचणीचा प्रसंग असो, लहानमोठे कार्य असो, प्रत्येक वेळी रवींद्रच सर्वांचा आधार असायचे. रवींद्र यांच्या देहावसानाने त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.’ – श्रीमती मेघना वाघमारे (रवींद्र देशपांडे यांच्या सासूबाई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२१) |