उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. कल्याणी फाटक ही एक आहे !
अंबरनाथ येथील कु. कल्याणी फाटक हिचा वैशाख कृष्ण पक्ष चतुर्थी (२९.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे.
‘कु. कल्याणी मागील काही मासांपासून तिच्या आईच्या समवेत देवद आश्रमात येत आहे. तिच्याविषयी तिची मामी सौ. रूपाली वर्तक यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.
कु. कल्याणी फाटक हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. आश्रम जीवनात समरस होणे
कल्याणी आश्रमात आणि साधक यांच्यामध्ये पूर्ण समरस झाली आहे. सर्व साधकांशी तिने स्वतःहून ओळख करून घेतली. आश्रमात कुणीही नवीन साधक किंवा साधिका आली की, कल्याणी प्रथम जाऊन त्यांच्याशी ओळख करून घेते.
२. सेवाभाव
ती सर्व सेवांच्या ठिकाणी जाते आणि कुणीही काहीही सेवा सांगितली, तरी मनापासून अन् आनंदाने करते.
३. चूक फलकावर लिहिल्याचा आनंद अनुभवणे
कल्याणीला एकदा फळ्यावर चूक लिहिण्याविषयी सांगितले. तेव्हा तिने अन्य एका तिच्याहून थोड्या मोठ्या वयाच्या बालसाधिकेचे साहाय्य घेऊन फळ्यावर चूक लिहिली आणि पुष्कळ आनंदाने मला सांगायला आली.
४. शिकण्याची आवड आणि चिकाटी
आश्रमात बिंदुदाबन शिबिर झाले. त्यातील वर्गांना ती प्रतिदिन न चुकता स्वतःहून जात होती. त्यासाठी तिने वहीसुद्धा केली आणि ‘वर्गात काय शिकवतात’, ते समजून आणि लिहून घेण्याचा तिने तिच्या परीने प्रयत्न केला.
५. स्वतःच्या खाण्याच्या क्षमतेचा अंदाज असल्याने वाढून घेतलेले अन्नपदार्थ वाया न जाणे
जेवतांना किंवा न्याहारी घेतांना किती वाढून घेतले पाहिजे, ती किती खाऊ शकते, याचा तिला अगदी योग्य अंदाज असतो. ‘कधीही अधिक झाले किंवा जात नाही; म्हणून आईला दिले’, असे तिच्याकडून होत नाही.
६. श्रीकृष्णाप्रती असलेला भाव
६ अ. घड्याळात श्रीकृष्ण जेवत असल्याचे दिसणे : एकदा ती जेवतांना भोजनकक्षातील घड्याळाकडे पाहून आईला म्हणाली, ‘‘मला घड्याळात ‘श्रीकृष्ण जेवत आहे’, असे दिसत आहे.’’
६ आ. साधिकेत श्रीकृष्ण दिसत असल्याने तिला बिलगणे : आश्रमातील एका साधिकेला ती बर्याचदा जाऊन बिलगत असे. त्याविषयी आईने विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मला तिच्यात श्रीकृष्ण दिसतो. त्यामुळे ‘श्रीकृष्णालाच मिठी मारत आहे’, असे मला वाटते.’’
आळशीपणा हा तिच्यात दोष आहे.
‘परात्पर गुरु डॉक्टर, दैवी बालकांची वैशिष्ट्ये मला जवळून अनुभवायला दिल्यामुळे मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. रूपाली वर्तक (कु. कल्याणीची मामी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.२.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|