भरतपूर (राजस्थान) येथील भाजपच्या महिला खासदारावर गुंडांकडून आक्रमण

घटनेची माहिती दिल्यानंतर ४५ मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोचले, तर जिल्हाधिकार्‍यांनी दूरभाष उचलला नाही !

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर आक्रमण होत असेल आणि पोलीस, प्रशासन त्याकडे गांभीर्याने पहात नसेल, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • स्वतःला लोकशाहीची ठेकेदार समजणारी काँग्रेस किती लोकशाहीद्रोही आहे, हे यातून लक्षात येते !
खासदार रंजीता कोली

जयपूर (राजस्थान) – राज्यातील भरतपूर येथील भाजपच्या खासदार रंजीता कोली यांच्यावर गुंडांकडून आक्रमण करण्यात आले. यात त्या घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना २७ मेच्या रात्री धरसोनी गावामध्ये घडली. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस ४५ मिनिटांनंतर घटनास्थळी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांना सतत दूरभाष केल्यानंतरही त्यांनी तो उचलला नाही, असाही दावा कोली यांच्या समर्थकांनी केला आहे.