आईला मारहाण होत असल्याने रागाच्या भरात मुलानेच पित्यावर ३ गोळ्या झाडल्या

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – आईला मारहाण झाल्याने रागाच्या भरात आष्टी (बीड) येथील विनायकनगर भागात २० मेच्या सायंकाळी मुलानेच पित्यावर ३ गोळ्या झाडल्या. यामध्ये वडील गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगरला हालवण्यात आले आहे. मुलगा किरण लटपटे याला आष्टी पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार करणारा मुलगा नुकताच सैन्यातून निवृत्त झालेला आहे. त्याच्याकडे बंदुकीचा परवाना होता. घायाळ संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.