वीजवाहिनी दुरुस्त करत असतांना विजेचा धक्का बसून कर्मचारी घायाळ

कणकवली – तालुक्यातील कलमठ येथे १९ मे २०२१ या दिवशी खांबावर चढून वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत असतांना विजेचा धक्का बसून महावितरण आस्थापनेचे कर्मचारी अजय नारकर २० फूट उंचीवरून खाली पडून घायाळ झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.