
कोल्हापूर, १९ मे (वार्ता.) – शिवसेना आणि युवा सेना यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना हळदयुक्त गरम दुधाचे वाटप चालू करण्यात आले आहे. हा उपक्रम ५ दिवस चालणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे यांच्या हस्ते या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी केले आहे.

या वेळी सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, नीलेश जाधव, बापू कोळेकर, जिल्हा युवा अधिकारी मंजित माने यांसह अन्य उपस्थित होते.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !