आवरण काढल्यावर साधकाला झालेले लाभ !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नियमितपणे त्रासदायक आवरण काढण्याविषयी सूचना दिली होती. मी दिवसभरात ७ – ८ वेळा आवरण काढल्याने मला चांगला लाभ होत आहे. त्या लाभाविषयी येथे दिले आहे.

श्री. निखील पात्रीकर

१. ‘मला सेवा करतांना अनेक वेळा ‘डोके जड होणे, काहीही न सुचणे’, असे त्रास होत होते. त्या वेळी प्रार्थना करून आवरण काढल्यावर काही वेळातच मला होत असलेला त्रास दूर होऊन मला हलकेपणा जाणवतो.

२. मी नामजप करतांना मधूनमधून आवरण काढतो. तेव्हा मला जांभया येऊन आलेली ग्लानी नाहीशी झाली.

घोर आपत्काळात ‘साधकांनी त्रासावर मात करून स्वयंपूर्ण बनावे’, यासाठी परात्पर गुरुमाऊलींनी साधकांना विविध उपाय उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

–  श्री. निखील पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक