महिलेवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या पाद्य्राला अटक !

पाद्य्रांची वासनांधता जाणा ! नेहमी हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करणारी प्रसारमाध्यमे पाद्य्रांच्या कुकर्माविषयी बोलत नाहीत !

केंद्रपाडा (ओडिशा) – शहरापासून जवळच असलेल्या ‘लुथरन महिला समिती’ या बाल सुश्रुषा गृह आणि वृद्धाश्रमात कामाला असलेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादल्याच्या प्रकरणी कुंजबिहारी दास या ६० वर्षीय पाद्य्राला अटक करण्यात आली. पीडित महिला निराधार असून मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे. प्रोटेस्टंट ख्रिस्ती संघटनेच्या अध्यक्षा प्रमिला त्रिपाठी यांचा भाऊ जगन्नाथ त्रिपाठी याचाही या बलात्कार प्रकरणात सहभाग असून तो फरार आहे. (हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक ! – संपादक)

ओडिशा राज्य बाल हक्क सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षा संध्याबती प्रधान यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली आणि पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास सूचित केले. त्यानंतर पाद्य्राला अटक करण्यात आली.

पीडित महिलेचा पती वर्ष २०१४ मध्ये झालेल्या खुनाच्या प्रकरणात कारावास भोगत आहे. या महिलेने वर्ष २०१६ आणि वर्ष २०१८  मध्ये बालकांना जन्म दिला होता. प्रोटेस्टंट ख्रिस्ती संघटनेच्या अध्यक्षा प्रमिला त्रिपाठी यांनी संबंधित महिलेची अनुमती न घेता दत्तक देण्याच्या नावाखाली या मुलांची परस्पर विक्री केली होती. (ख्रिस्त्यांकडून मानवतेच्या नावाखाली चालवल्या जाणार्‍या संघटनांमध्ये समाजविरोधी कृत्य चालत असल्याचे दिसून येते ! अशा संघटनांवर बंदीच हवी ! – संपादक) ‘लुथरन महिला समिती’ला राज्याच्या महिला आणि बाल कल्याण आयोगाकडून निधी प्राप्त होतो तसेच या समितीची ‘फॉरेन कॉन्ट्रुब्युशन रेग्युलेशन अ‍ॅक्ट’च्या (एफ्.सी.आर्.ए.च्या) अंतर्गत नोंदणी झाली असल्याने तिला अमिरीका आणि इटली येथूनही निधी प्राप्त होतो.

लुथरन महिला समितीच्या ठिकाणी मानसिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍या महिलांना हेरून त्यांचा ‘सरोगसी मदर’ (मूल जन्माला घालण्यासाठी महिलेचे भाड्याने गर्भाशय घेणे) म्हणून वापर केला जात आहे का, तसेच या महिला जन्माला घालत असलेल्या मुलांची विक्री विदेशात करून त्या बदल्यात विदेशातून निधी मिळवल्या जात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.