गुरु म्हणजे ईश्वराचे साकार रूप आणि ईश्वर म्हणजे गुरूंचे निराकार रूप या योगातील मुख्य साधना म्हणजे आपले मन, बुद्धी आणि अहं गुरूंना अर्पण करणे, तसेच आपल्या मनाने विचार न करता आणि आपल्या बुद्धीने निर्णय न घेता गुरूंच्या विचाराने अन् निर्णयाप्रमाणे वागणे, यांमुळे मन, बुद्धी अन् अहं यांचा लय लवकर होऊन आध्यात्मिक प्रगती वेगाने होते.