‘गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते. गुरुकृपायोग हा ‘यो बुद्धेः परतस्तु सः ।’ म्हणजे ‘बुद्धीच्या पलीकडील स्तरावरील’ असल्यामुळे ज्यांनी आपल्या विश्वबुद्धीने गुरुकृपायोग निर्माण केला, ते परात्पर गुरुच गुरुकृपायोगाला पूर्णत्वाने जाणू शकतात.’
– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (४.३.२०१३)