कोरोनावरील लसीच्या निर्मितीसाठी राज्यशासनाकडून हाफकिनला मान्यता !

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ

मुंबई – हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास कोविड लस प्रकल्प चालू करण्यास राज्यशासनाकडून मान्यता देण्यात आली. यासाठी ‘भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड’ या आस्थापनाकडून केंद्रशासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेण्यात येणार आहे. हाफकिनच्या मुंबईतील परळ येथील जागेत हा प्रकल्प चालू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १५४ कोटी रुपये व्यय येईल. राज्यशासनाच्या आकस्मित निधीतून हा व्यय केला जाणार असून यामध्ये केंद्रशासनाकडून ६५ कोटी रुपये इतके अर्थसाहाय्य संमत करण्यात आले आहे.