ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने २ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी करा !

धनंजय मुंडे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश 

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड – येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा अज्ञात व्यक्तीने बंद केल्याने येथील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले असून या गोष्टीत तथ्य असेल, तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे, तसेच या प्रकरणी आपल्याकडेही काहींनी तक्रारी दिल्या असून त्याची गंभीर नोंद घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी या वेळी सांगितले.