मुंबई – ११ एप्रिल या दिवशी होणार असलेली एम्पीएस्सीची परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे ढकलली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक बोलावली होती. या बैठकीमध्येच हा निर्णय झाला असल्याचे वृत्त आहे. परीक्षेच्या पुढील दिनांकाविषयी कळवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.