शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व टिकून !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

‘सनातन धर्माचे स्वरूप विशाल आणि कल्याणकारी आहे. सनातन धर्मच सर्वांच्या हिताचा विचार करतो. संपूर्ण सृष्टीची चिंता सनातन धर्माला असते. सनातन धर्माला संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून आक्रमणे होत असून विविध प्रकारची षड्यंत्रे रचली गेली; मात्र शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व अजूनही टिकून असून ते कायम राहील. प्रत्येक व्यक्ती जन्मजात सनातनी आहे. पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर ती विविध जाती-वर्ग यांमध्ये विभागली जाते.’

– शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज, ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर