जम्मू – जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी जम्मू-काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयांवर येत्या १५ दिवसांत राष्ट्रध्वज फडकावण्याचा आदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० असतांना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज फडकावण्यात येत असे; मात्र कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्यात आले. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांनी काही सूचना केल्या आहेत. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्याचा तपशील सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्वांना अमृत महोत्सवाच्या विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.
LG directs officials to hoist tricolor on govt buildings within 15 days – https://t.co/QiT6yly2Uu
— Free Press Kashmir (@FreePressK) March 29, 2021