आपल्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्याचा संकल्प आपणच केला पाहिजे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

‘व्यवस्थापनाच्या नावाखाली हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात असून यातून देवनिधीची अतोनात लूट होत आहे. हिंदूंंनी अर्पण केलेल्या निधीचा वापर अन्य धर्मियांच्या संस्था आणि प्रार्थनास्थळे यांच्यासाठी वापरला जातो; मात्र चर्च किंवा मदरशांचे सरकारीकरण करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही. मंदिरांवर सरकारी विश्‍वस्त म्हणून अन्य पंथियांची नियुक्ती होत आहे.

आपल्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्याचा संकल्प आपणच केला पाहिजे. त्यासाठी एक राष्ट्रव्यापी लढा उभारण्याची आवश्यकता आहे. म्हणून सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांनी ‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षण अभियान’ राबवण्याचा संकल्प केला आहे.’