उपजतच समजूतदार आणि साधनेची तळमळ असलेली सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा अजय पवार (वय १३ वर्षे) !

उपजतच समजूतदार आणि साधनेची तळमळ असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा अजय पवार (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. समीक्षा पवार ही एक आहे !

(वर्ष २०१६ मध्ये कु. समीक्षाची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सांगवी, पुणे येथील कु. समीक्षा पवार हिचा माघ कृष्ण पंचमी (३.३.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सांगवी, पुणे येथे रहाणारे तिचे आजी-आजोबा, मावशी आणि मामा यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

समीक्षा सव्वा वर्षाची असतांना तिची आई वारली. आई गेल्यापासून ती तिच्या आजी-आजोबांसह (आईचे आई-बाबा, श्री. आणि सौ. लोणे यांच्यासह) रहात आहे.

कु. समीक्षा पवार

कु. समीक्षा पवार हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !

१. वय – ५ ते ८ वर्षे

१ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘आमच्या घरातील सर्वजण साधना करतात. समीक्षाच्या आजीकडे सांगवी केंद्राची सेवा आहे. ‘समीक्षाला बाहेर फिरायला घेऊन जाणे, खरेदीला किंवा बागेत घेऊन जाणे’, असे आजपर्यंत कधी झाले नाही; पण याविषयी तिची कोणतीही तक्रार नसते.’ – श्री. अविनाश लोणे (कु. समीक्षाचे आजोबा)

१ आ. समजूतदारपणा : ‘कु. समीक्षामध्ये ‘समजूतदारपणा’ हा गुण उपजतच आहे. तिला कोणतीही गोष्ट सांगावी लागत नाही. सभेच्या वेळी बालसाधक आमच्या घरी यायचे. काही वेळेस त्यांच्याकडे अत्तर, कापूर नसेल, तर ते त्यांना देणे, स्वतःकडील खेळण्यांनी सर्वांसह खेळणे, या कृती ती सहजतेने करायची. घरातील इतर व्यक्ती सेवेमध्ये व्यस्त असतांना ‘त्यांना आपला त्रास होणार नाही’, याची ती काळजी घ्यायची. आहे त्या परिस्थितीत ती आनंदी रहाण्याचा प्रयत्न करायची.

२. वय – ८ ते १२ वर्षे

२ अ. शिकण्याची वृत्ती : नवीन भ्रमणभाष संचामधील नवीन ‘अ‍ॅप्लिकेशन’ ती स्वतःच शिकते आणि सर्व करून पहाते.’ – श्री. अवधूत लोणे (कु. समीक्षाचा मामा)

२ आ. प्रेमभाव : ‘घरातील सर्व व्यक्ती, शाळेतील मित्र-मैत्रिणी, तसेच बालसाधक या सर्वांशी समीक्षा प्रेमाने वागते. सांगवी येथील सभेच्या वेळी तिला बालकक्षामध्ये सेवा करण्याची संधी मिळाली होती. सरावासाठी सर्व बालसाधक घरी यायचे. त्या बालसाधकांचे आई-वडील प्रसाराच्या सेवेतून येईपर्यंत ती त्यांना सांभाळायची. घरात रुग्णाईत असलेल्या व्यक्तीची ती प्रेमाने काळजी घेते.’ – श्री. अविनाश लोणे

२ इ. इतरांचा विचार करणे

१. ‘घरात कुणी खाऊ आणला किंवा तिला कुणी खाऊ दिला, तर घरातील प्रत्येक व्यक्तीला तो मिळेल, असे नियोजन ती करते.

२ ई. त्यागी वृत्ती

१. समीक्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेतील सर्वांनी मिळून तिला गळ्यातील एक हार भेट म्हणून दिला. ती घरी आल्यावर म्हणाली, ‘‘हा हार पुष्कळ मोठा आहे. मी लहान आहे. मी हा कधी घालणार ?’’, असे म्हणून तिने तो हार मला घालण्यासाठी दिला.

२. तिला कुणीही खाऊसाठी पैसे दिल्यास ती ते गुरुपौर्णिमेला अर्पण करण्यासाठी साठवते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्पण करते.’

– कु. प्रियांका लोणे (कु. समीक्षाची मावशी)

२ उ. सात्त्विक कृतींची आवड

२ उ १. धर्माचरण करणे : ‘मुलींनी कपाळावर कुंकू लावले पाहिजे’, ही कृती मनावर बिंबल्यामुळे शाळेत, घरी आणि बाहेर जातांना ती कपाळावर कुंकू लावूनच जाते.

२ उ २. नियमित अग्निहोत्र करणे : समीक्षा प्रतिदिन सायंकाळी घरी होणार्‍या अग्निहोत्राची पूर्वसिद्धता करते. मंत्र म्हणून आहुती देण्याची सेवा ती स्वतःहून आवडीने करते. गोवर्‍यांची रचना गोमुखाप्रमाणे करणे, अग्निहोत्राची विभूती झाडांना घालून पात्र स्वच्छ करणे आदी कृतीही ती कटाक्षाने करते.’

– सौ. पद्मा लोणे (कु. समीक्षाची आजी)

२ उ ३. घरातील देवपूजा भावपूर्ण करणे : ‘समीक्षा पाचवीत असल्यापासून देवपूजा आवडीने आणि आनंदाने करते. तिचा व्यष्टी साधनेचा आढावा चालू झाल्यापासून ती भावपूर्ण पूजा करण्याचा प्रयत्न करत आहे. पूजा करतांना ‘श्रीकृष्ण माझी पूजा पहात आहे’, असा तिचा भाव असतो. देवासमोर रांगोळी काढणे, देवाला स्नानासाठी गरम पाणी करणे, देवाला थंडी वाजू नये; म्हणून वस्त्र घालणे, सणांच्या दिवशी देवतांना सर्व अलंकार घालणे, फुले अर्पण करणे आणि कापूरारती करणे, या सर्व कृती ती भावपूर्ण रितीने करते.

२ ऊ. साधनेची ओढ

२ ऊ १. आश्रमात जाण्याची ओढ : सुटीच्या वेळी एकदा समीक्षा तिच्या मावशी समवेत देवद आश्रमात गेली होती. त्या वेळी तिने तेथील विविध सेवांत आवडीने सहभाग घेतला. आता सुटी जवळ आली की, तिला आश्रमात जाण्याची ओढ लागलेली असते.’

– कु. प्रतिमा लोणे (समीक्षाची मावशी)

२ ऊ २. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

अ. व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे समीक्षात स्वतःमध्ये पालट करण्याची तळमळ निर्माण झाली आहे. ती प्रतिदिन व्यष्टी साधनेचे प्रयत्न उत्साहाने करते. ती स्वतःच्या चुका सांगते आणि इतरांनाही विचारते. स्वभावदोषांची व्याप्ती काढतांना ‘कोणते स्वभावदोष घेतले पाहिजेत ?’, हे विचारून घेते. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात चूक झाल्यावर क्षमायाचना करायला सांगितली होती. त्या वेळेपासून ती कान पकडून क्षमायाचना करते आणि प्रायश्‍चित्त म्हणून पाच उठाबशा काढते.

आ. समीक्षा घरातील व्यक्तींना त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊन त्यांना साधनेत साहाय्य करते.’

– श्री. अविनाश लोणे

२ ऊ ३. सेवेची तळमळ असल्याने आजी-आजोबांना सेवेत साहाय्य करणे : ‘समीक्षा घरातील सर्व कृती ‘आश्रमसेवा’ म्हणून करते. ती तिच्या आजीला आढावा पाठवण्यासाठी साहाय्य करते. तिच्या आजोबांकडे वस्तूंच्या साठ्याची सेवा आहे. सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यासाठी उत्पादनांचा साठा काढणे, तसेच प्रदर्शन पूर्ण झाल्यावर परत साठा मोजणे, अशा सर्व सेवांमध्ये ती साहाय्य करते.’

– श्री. अवधूत लोणे

२ ऊ ४. सद्गुरु (कु.) स्वाती खाडयेताईंनी सांगितलेल्या सर्व सूत्रांचे ती पालन करते.

२ ए. परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव असणे : ‘समीक्षाचा परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव आहे. तिने गुरुदेवांना अजून पाहिलेले नाही. गुरुदेवांची ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ही पुस्तिका तिने सतत समवेत घेतलेली असते. ती या दर्शनपुस्तिकेच्या माध्यमातून गुरुदेवांना अनुभवत असते. ‘गुरुदेवांचे छायाचित्र पहाणे आणि त्यांच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवणे’, या कृती ती भावपूर्ण करते.’ – सौ. पद्मा लोणे

परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या कृपेचा हात सदैव समीक्षाच्या मस्तकावर ठेवलेला आहे. तेच तिला सांभाळत आहेत. गुरुदेवांनी आम्हा सर्वांना समीक्षाविषयी लिखाण करण्याची संधी देऊन हे सर्व लिहून घेतले, त्याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

– लोणे कुटुंबीय, सांगवी, पुणे. (२४.११.२०२०)

सर्व साधकांशी प्रेमाने वागणारी आणि सद्गुरु (कु.) स्वातीताईंप्रती अवर्णनीय प्रेम असलेली कु. समीक्षा पवार !

१. व्यवस्थितपणा : ‘अगदी बालवाडीपासून समीक्षामधे ‘व्यवस्थितपणा’ हा गुण दिसून येतो. ती तिचे खेळाचे सर्व साहित्य, तिच्या शालेय वस्तू आणि तिचे सर्व अलंकार नीटनेटकेपणाने खोक्यात ठेवते.

२. देवाची ओढ : लहानपणी भजने लावून ठेवल्यावर समीक्षा शांतपणे खेळायची. ती कधी रडू लागली आणि गणपतीची गाणी लावली की, ती शांत व्हायची.

३. २ – ३ दिवस एक फुलपाखरू समीक्षाच्या समवेत असणे : समीक्षा ३ वर्षांची असतांना तिच्या घरून आमच्याकडे दुचाकी वाहनावरून येत होती. त्या वेळी तिच्या हातावर बसून एक फुलपाखरू आले. दिवसभर ते आमच्या येथील झाडांवर खेळत होते. रात्री समीक्षा घरी जातांना ते तिच्या हातावर बसून तिच्यासह गेले. रात्रभर ते तिच्या डोक्याजवळ बसून होते. सलग २ – ३ दिवस ते फुलपाखरू तिच्याशी खेळत होते. त्या वेळी तीसुद्धा त्याच्याशी प्रेमाने खेळायची.

४. परेच्छेने वागणे : बाजारात समीक्षासाठी कपडे, बांगड्या आदी खरेदी करायला गेल्यावर तिची आजी किंवा मावशी जे सांगतील, ते ती स्वीकारते. तिचा ‘मला हेच हवे’, असा हट्ट नसतो.

५. तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणे : तिला एखादी सेवा सांगितल्यावर उत्तरदायी साधकांनी सांगितलेले प्रयत्न ती तळमळीने आणि भावपूर्ण करते. जोपर्यंत ‘आता तुला छान जमू लागले आहे’, असे सांगत नाहीत, तोपर्यंत ती विचारून प्रयत्न करत रहाते.

– श्रीमती वंदना करचे (साधिका, पुणे)

६. सेवेत साहाय्य करणे : ‘काही सेवांनिमित्त मी लोणेकाकूंच्या घरी पुष्कळ वेळा निवासासाठी थांबते. तेव्हा समीक्षा मला ‘मी तिची मोठी ताईच आहे’, याप्रमाणे सर्व विचारते. मला सेवेत जमेल, तसे साहाय्य करते. ती लहान आहे; पण तसे तिच्या कोणत्याही कृतींमधे जाणवत नाही. ती स्वतःचे सर्व स्वतःच करते. समीक्षा अधूनमधून भ्रमणभाष करून ‘तू कशी आहेस ताई ?’, असे मला पुष्कळ प्रेमाने विचारते. समीक्षातील प्रेमभाव, समजूतदारपणा, इतरांना साहाय्य करणे आदी भाग पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे.

७. बालसाधकांना प्रेमाने सांभाळणे : ती सर्व बालसाधकांना सामावून घेऊन त्यांच्याशी खेळते. बालसाधकांपैकी कुणाचा वाढदिवस असेल, तर त्यांना शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू देते. तिच्यापेक्षा वयाने लहान बालसाधकांना ती उत्तम प्रकारे सांभाळते. ते दुखावले जाणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेते.’

८. शिबिरार्थींमध्ये सर्वांत लहान असूनही पूर्ण दिवस न कंटाळता सहभागी होणे : दिवाळीत युवा साधकांसाठी मिरज येथे ४ – ५ दिवस शिबिर होते. शिबिरार्थींमध्ये समीक्षा सर्वांत लहान असूनसुद्धा ती ५ दिवस आनंदाने सर्वांसह राहिली. शिबिर पूर्ण दिवस असायचे; पण तिने न कंटाळता पूर्णवेळ एका जागी बसून सगळे विषय मन लावून ऐकले आणि सर्व सूत्रे वहीत लिहून घेतली.’

– कु. वैभवी भोवर (साधिका, पुणे)

९. सद्गुरु (कु.) स्वातीताईंप्रती असलेला भाव : सद्गुरु (कु.) स्वातीताईंविषयी तिच्या मनात अवर्णनीय प्रेम आहे. ‘सद्गुरु ताई घरी रहायला याव्यात’, असे तिला वाटते किंवा ताई जिथे असतील, तिथे तिला रहायला जायचे असते. ताईंशी ती पुष्कळ मोकळेपणाने बोलते. ‘सद्गुरु स्वातीताई चिंचवड विभागात येणार आहेत’, असे समजल्यावर तिला अतिशय आनंद होतो. ती त्यांची आतुरतेने वाट पहाते. ‘सद्गुरु स्वातीताईंसह प्रसाराची सेवा शिकण्यासाठी जायचे आहे’, असे ती म्हणते.’  – कु. वैभवी भोवर आणि श्रीमती वंदना करचे पुणे.

‘समीक्षा घरातल्या कोणा व्यक्तींमध्ये भावनिक स्तरावर अडकलेली नाही’, असे जाणवते. समीक्षामधील गुण पाहून तिची आध्यात्मिक उन्नती चांगल्या प्रकारे होत आहे’, असे वाटते. देवाने तिच्यातील हे गुण शिकण्याची संधी दिली, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता !’ – कु. वैभवी भोवर, पुणे.


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक