|
पलक्कड (केरळ) – येथे मदरशामधील ३० वर्षीय शिक्षिकेने अल्लाला खुश करण्यासाठी स्वत:च्या ६ वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याची हत्या केली. तिला असणार्या ३ मुलांपैकी हा सर्वांत लहान मुलगा होता. ही महिला आता गरोदर असल्याचीही माहिती आहे.
#Kerala: केरल में एक मदरसा टीचर ने ‘अल्लाह को खुश’ करने के लिए कुर्बानी के तौर पर 6 साल के अपने बेटे की गला काटकर हत्या कर दी, उसने पुलिस को बताया कि अल्लाह को खुश करने के लिए अपने बेटे की कुर्बानी दी…https://t.co/WVaWs2r1WX pic.twitter.com/wZZZ6wW8WE
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) February 8, 2021
आरोपी महिलेने हत्या करून स्वत: पोलीस आणि तिच्या नातेवाइकांना दूरभाष करून घटनेची माहिती दिली. या आरोपी शिक्षिकेने सांगितले, ‘मी माझ्या मुलाची अल्लासाठी कुर्बानी दिली आहे.’ यानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे.
Pregnant Woman Kills 6 Year-old Son in Kerala to ‘Please’ God; Held https://t.co/R5ksdW72wt
— MSN India (@msnindia) February 7, 2021
या महिलेने ७ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता हा मुलगा झोपलेला असतांना त्याला उठवून स्नानगृहात नेले. तेथे त्याचे हातपाय बांधले, त्यानंतर तिने मुलाचा गळा चिरला. या वेळी मुलगा तडफडत होता. घटनेच्यावेळी आरोपी महिलेची दोन्ही मुले वडिलांसमवेत दुसर्या खोलीमध्ये झोपली होती. आरोपी महिलेचा पती काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परतला होता.