महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील चि. सोहम् राहुल भरमगुंडे याची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील चि. सोहम् राहुल भरमगुंडे (वय १ वर्षे ३ मास) याची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. सोहम् भरमगुंडे

सातारा – येथील चि. सोहम् भरमगुंडे याने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २२ जानेवारीला एका ‘ऑनलाईन’ सत्संगाद्वारे घोषित केले. चि. सोहम् विषयी सांगताना सद्गुरु स्वाती ताई म्हणाल्या, ‘‘चि. सोहम् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आला आहे. ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाला आहे. सातारा जिल्ह्यात सात्त्विक जीव मिळाला.’’ या वेळी सौ. माधुरी दिक्षित यांनी त्याला खाऊ दिला. सत्संगात चि. सोहम याचे आई, बाबा, आजी-आजोबा असे कुटुंबीय उपस्थित होते. सर्व कुटुंबियांची भावजागृती झाली.

चि. सोहम यास खाऊ देतांना सौ. माधुरी दिक्षीत (उजवीकडे) समवेत सोहमची आई सौ. ज्योती आणि वडील श्री. राहुल भरमगुंडे

चि. सोहम्’चे आजोबा श्री. शरद भरमगुंडे यांनी सांगितले की, चि. सोहम् प्रतिदिन माझ्यासमवेत आरती करतो. आरती पूर्ण होईपर्यंत हलत नाही. आरती संपल्यावर सर्व देवतांच्या पाया पडतो.

जन्मापासूनच सात्त्विक असलेला चि. सोहम् राहुल भरमगुंडे !

१. जन्मापूर्वी  

१ अ. पत्नी गरोदर असतांना गुरुपौर्णिमा उत्सवाच्या ठिकाणी येणे आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे अन् नामजप करणे यांमुळे ग्रहणाचा कालावधी असूनही तिला कोणताही त्रास न होणे : ‘माझी पत्नी सौ. ज्योती गर्भवती असतांना गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने घरातील आम्ही सर्व जण गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सेवेसाठी सभागृहात गेलो होतो. त्या वेळी तेथे ज्योतीही आली होती. त्या दिवशी तिला पुष्कळ चांगले वाटले आणि कोणताही त्रास जाणवला नाही. त्या दिवशी ग्रहणाची वेळ रात्रीपासून चालू होऊन पहाटेपर्यंत होती. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि भक्तीगीते ऐकल्याने अन् नामजप केल्याने ज्योतीला कोणताही त्रास जाणवला नाही. त्यामुळे माझा कृतज्ञतेचा भाव जागृत झाला.

१ आ. ज्योती अधूनमधून नामजप करत असे. तेव्हा तिला पोटातील बाळाची पुष्कळ हालचाल जाणवत असे.

२. जन्मानंतर

२ अ. जन्मानंतर त्याच्या आजीने (बाळाच्या आईच्या आईने) बाळाकडे पाहिले. तेव्हा त्याच्या कपाळावर नाम असल्यासारखी खूण आणि हाताच्या पाठीमागे ‘ॐ’ असल्याचे तिच्या लक्षात आले.

२ आ. वय ४ ते ६ मास

 १. झोपेत त्याच्या हाताची मूठ आणि वेगवेगळ्या मुद्रा असतात.

२. घरातील श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊली यांच्या प्रतिमेकडे तो एकटक पहात रहातो आणि मधूनच टाळ्या वाजवतो. आषाढी एकादशीच्या वेळी आम्ही ‘विठ्ठल, विठ्ठल’ असे म्हटल्यावर तो टाळ्या वाजवत असे.

२ इ. वय ८ ते ९ मास 

१. वर्ष २०२० गुरुपौर्णिमेच्या आधी त्याच्या अंगावर सातत्याने दैवी कण दिसत होते.

२. सोहम् ची आजी (सौ. शैलजा शरद भरमगुंडे, सोहम् च्या वडिलांची आई) जेव्हा मोरपीस, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि उदबत्ती यांनी स्वतःवरील आवरण काढते, तेव्हा सोहम् ला पुष्कळ आनंद होतो. तो मोरपिसाकडे हात करतो आणि ते घेण्याची त्याची धडपड असते.

 ३. स्वभावदोष 

राग येणे आणि मोठ्याने ओरडणे

‘सोहम् कडून साधना परिपूर्ण होण्यासाठी प.पू. गुरुमाऊलींनीच बळ द्यावे आणि साधना करवून घ्यावी’, हीच त्यांच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.

प.पू. गुरुमाऊली, ‘तुम्हीच हे लिखाण माझ्याकडून लिहून घेतले’, त्यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. राहुल शरद भरमगुंडे (वडील), सातारा (२४.७.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक