कर्नाटक विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार पहात होते पॉर्न व्हिडीओ !

विधान परिषदेत पॉर्न पहाणारे प्रत्यक्ष जीवनात काय करत असतील, याचा विचार जनतेच्या मनात येत असणार ! काँग्रेसमध्ये नैतिकता नावाची गोष्ट असेल, तर अशा आमदारांवर कारवाई होईल अन्यथा सर्वच एकाच माळेचे मणी !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्याच्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये भ्रमणभाष संचावर काँग्रेसचे आमदार प्रकाश राठोड अश्‍लील व्हिडिओ (पॉर्न) पहात असल्याचे समोर आले आहे. सभागृहामधील कामकाजाच्या वेळी छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्रांमध्ये राठोड अश्‍लील व्हिडीओ पहातांना दिसत आहेत. भाजपाच्या प्रवक्त्यांनी राठोड यांच्या विरोधात काँग्रेसकडून कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

१. याविषयी राठोड यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘मी इंटरनेटवर काही बघत नव्हतो. मी सामान्यपणे सभागृहामध्ये भ्रमणभाष संच घेऊन जात नाही; मात्र या सत्रामध्ये मला काही प्रश्‍न विचारायचे होते. याच कारणासाठी मी तो घेऊन आलो होते. त्याच संदर्भात मी तो पडताळायला लागलो. त्या वेळी त्यामधील माहिती साठवण्याची क्षमता भरली असल्याचे दिसले. त्यानंतर मी त्यामधील व्हिडीओ डिलीट करू लगलो.’

( सौजन्य : India Ahead)

२. वर्ष २०१२ मध्ये लक्ष्मण सवदी (आताचे उपमुख्यमंत्री) आणि इतर २ आमदार सभागृहाचे कामकाज चालू असतांना अश्‍लील व्हिडीओ पहतांना आढळून आले होते.