Karnataka Temples CCTV : राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा आदेश !

कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिर दान चोरीच्या घटनेनंतर, कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा आदेश दिला  आहे. कर्नाटकातील मंदिरांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दानपेटी असलेली ठिकाणे आणि पैसे मोजण्याची ठिकाणे यांसह मंदिराच्या सर्व भागांत ‘सीसीटीव्ही’ लावले जातील. मंदिरातील हालचालींवर २४ घंटे लक्ष ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

कर्नाटकातील ‘सेक्युलर’ सरकारचा मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु सरकारकडून अशीच तरतूद चर्च आणि मशिदी यांमध्येही करणे अपेक्षित आहे !