एका संतांच्या सत्संगात घेतलेल्या एका सूक्ष्मातील प्रयोगात आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१६.८.२०२० या दिवशी आम्हाला एका संतांच्या सत्संगाचा लाभ झाला. सत्संग चालू झाल्यानंतर अनुमाने २० ते २५ मिनिटांनी संतांनी सांगितले, या क्षणी काही वेळ श्‍वासघेतांना काय जाणवते ?, याचा अनुभव घ्या. तेव्हा आम्हाला जाणवले, आमचा श्‍वास चालू नाही. आम्ही एका वेगळ्याच विश्‍वात आहोत. आमच्या मनात अन्य कोणताही विचार नाही.

– कु. गीता चौधरी आणि श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक