२६ जानेवारी २०२१ या भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाप्रीत्यर्थ ईश्वरी पे्ररणेने स्फुरलेली कविता
प्रजासत्ताक वर्धापन दिन
अजि आहे एकाहत्तरावा ॥
गतकालाच्या घटनेतून घ्या ।
गती – प्रगतीचा आढावा ॥ १ ॥
कोरोना महामारीने दिला सर्व जगताला धक्का ॥
काय केला यातून शिकून प्रगतीचा निश्चय पक्का ॥ २ ॥
आपत्कालातूनही जो काही शिकत नाही ॥
विनाश त्याचा अटळ आहे क्षमा त्याला कधीच नाही ॥ ३ ॥
कोरोनामुळे जिकडे तिकडे मृत्यूचे सावट थैमान ॥
तरीही मागण्यांविषयी चर्चा मोर्चे, निदर्शने, काढती बेगुमान ॥ ४ ॥
सामाजिक अंतराविषयी फक्त सामान्यांनी ठेवायचे भान ॥
मोर्चे निदर्शने काढतांना कसले नियम आणि कसले भान ? ॥ ५ ॥
चीन-पाकच्या कुरापतींमुळे भारतावरी युद्धाचे सावट ।
त्यात भर पडली आहे कोरोना महामारीची थेट ॥ ६ ॥
सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळण्याची शक्यता ॥
हीच आहे का, प्रजासत्ताक भारताच्या संस्कृतीची योग्यता ? ॥ ७ ॥
राष्ट्रापेक्षा मोठे वाटते यांना राजकारण, आरक्षण आणि सत्ता ।
इतके सर्व घडत असूनही राष्ट्राविषयी कुणा न चिंता ॥ ८ ॥
धर्म टिकला, तर राष्ट्र टिकते असे अनेक थोरांनी म्हटले ॥
परंतु स्वार्थी सत्तांध यांना राष्ट्र-धर्माविषयी प्रेम कसले ? ॥ ९ ॥
धर्म-अधर्मातील युद्धाचा काळ समीप आला आहे ॥
हिंदु राष्ट्र निर्माणासाठी सनातन साद घालत आहे ॥ १० ॥
समस्त राष्ट्र-धर्म प्रेमींनो द्या प्रचंड प्रतिसाद एक मुखानी ॥
हिंदु राष्ट्र हेच प्रजासत्ताक राष्ट्र अन् तीच खरी आनंद पर्वणी ॥ ११ ॥
– श्री. दत्तात्रय र. पटवर्धन, कोलगाव, ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (१२.१२.२०२०)