अधर्माने वागणारी काँग्रेस !

‘काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती, तेव्हा तिने विरोधी पक्षांची राज्य सरकारे बलपूर्वक आणि लोकशाही मूल्यांना चिरडून अन् राज्यघटनाविरोधी निर्णय घेत विसर्जित केली होती. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी अयोध्येतील श्रीराजन्मभूमीवरील बाबरी ढाचा हिंदूंनी पाडल्यावर उत्तरप्रदेशातील भाजपचे सरकार विसर्जित केले. इतकेच नव्हे, तर त्या वेळी राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांतील भाजपची सरकारेही सूडबुद्धीने विसर्जित केली. हा अधर्म होता. अशा अधर्मियांची काही राज्यांत असलेली सरकारे केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पाडण्यात आलेली नाहीत. वास्तविक ती विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावणे धर्मानुसार आवश्यक आहे.

श्री. प्रशांत कोयंडे

येथे अधर्मियांशी ‘जशास तसे’ वागणे आवश्यक आहे. उद्या केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार आले, तर भाजपची सरकारे टिकून रहाणार नाहीत; कारण अधर्मी धर्माने नाही, तर अधर्मानेच वागणार आहेत. संपूर्ण देशात हिंदूंना सळो कि पळो करून सोडले जाईल, तर धर्मांधांना, आतंकवाद्यांना कडेवर घेऊन बिर्याणी खाऊ घातली जाईल. त्यामुळे धर्माने वागण्याचा आत्मघाती अट्टहास न करता अशांना कठोर धडा शिकवणार्‍या धर्माचे पालन केले पाहिजे. भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे.’

– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.