१. ‘गुरुदेवांना शरण गेल्यावर तेच परिस्थिती अनुकूल करतात’, याची साधिकेला आलेली प्रचीती !
१ अ. पंचांगाच्या सेवेसाठी बाहेर जात असतांना यजमानांनी बाहेर पाठवण्यास नकार देणे : ‘एकदा ऑनलाईन सत्संगामध्ये आम्हाला समाजातून पंचांगाची मागणी घेण्यास सांगितले होते. माझ्या घरी यजमानांचा विरोध असल्याने मी संबंधित साधकांना ‘‘मी घरी विचारून सांगते’’, असे सांगितले. मी माझ्या यजमानांना ‘‘मला सेवेसाठी बाहेर जायचे आहे. जाऊ का ?’’, असे विचारले. तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला आणि म्हणाले, ‘‘त्यापेक्षा तू घरी बसून नामजप कर.’’
१ आ. ‘गुरुदेवांना शरण जाऊन त्यांचे चरण पकडून बसले आहे’, असा भाव साधिकेने ठेवल्यावर काही वेळाने यजमानांनी ‘सेवेसाठी बाहेर जाऊया’, असे सांगणे आणि तेव्हा ‘गुरुदेवांना शरण गेल्यावर ते परिस्थिती अनुकूल करतात’, असा विचार येऊन कृतज्ञता वाटणे : त्या वेळी ‘मी गुरुदेवांना शरण जाऊन त्यांचे चरण पकडून बसले आहे’, असा भाव ठेवला. एका घंट्यानंतर माझ्या यजमानांनी मला सांगितले, ‘‘तुला सेवेसाठी बाहेर जायचे होते ना ? चल, आपण जाऊया.’’ तेव्हा मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि मी पंचांगाच्या सेवेला गेले. या प्रसंगात ‘गुरुदेवांना शरण गेले, तर गुरुदेव सर्वकाही देतात आणि तेच परिस्थितीही अनुकूल करतात’, असा विचार माझ्या मनात येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२. पंधरा वर्षांनंतर प्रथमच पू. (सौ.) उमाक्का रविचंद्रन् यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सेवेसाठी घराबाहेर जाता येणे आणि त्या वेळी पू. (सौ.) उम्माक्का यांचे चैतन्य कार्यरत झाल्याचे वाटून पुष्कळ आनंद मिळणे
आम्ही मदुराई येथे वास्तव्यास येऊन १५ वर्षे झाली होती; पण मी येथे आल्यावर एकदाही सेवेसाठी घराबाहेर गेले नाही. ज्या दिवशी पू. (सौ.) उमाक्का रविचंद्रन् यांचा वाढदिवस होता. या शुभदिवशी मला प्रथमच सेवेसाठी बाहेर जायला मिळाले. त्या वेळी ‘त्यांचे चैतन्य कार्यरत आहे’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळाला.’
– सौ. लक्ष्मी नायक, मदुराई, तमिळनाडू.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |