
कोल्हापूर – कोरोनाचा नवा विषाणूही सापडला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. ते नियोजित कोल्हापूर दौर्यावर असतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा केली जात आहे. महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याआधी जिल्ह्या जिल्ह्यातील महाविद्यालये आणि वसतीगृहे पुन्हा अलगीकरण कक्षासाठी देण्यात आली आहेत का?, याची माहिती घेतली जात आहे.

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?, याची दक्षता घेतली जात असल्यानेच महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्यात आलेली नाहीत. काही दिवसांत कोरोनाचे लसीकरण चालू होईल. लसीकरणाचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा होऊ द्या. त्यानंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी बैठक घेऊन महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.’’
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !