मंदिर समितीकडून प्रशासनाच्या आदेशाचे पालन

अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत नाताळ, श्री दत्त जयंती, आणि ख्रिस्ती नववर्ष यांनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच २५, २६ आणि २७ डिसेंबर या दिवशी सलग शासकीय सुट्टया आहेत. यात कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाने २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्रीपर्यंत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचे आणि भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश करण्यास अनुमती नसल्याचे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.

त्यानुसार २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते २ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वटवृक्ष मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनासाठी मंदिराकडे येण्याचे टाळावे आणि स्वामी भक्तांनी घरीच थांबून स्वामींची आराधना करावी, असे आवाहन इंगळे यांनी या प्रसंगी केले. या वेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगेे, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, विपुल जाधव, महादेव तेली, गिरीश पवार, महेश मस्कले आदी उपस्थित होते.
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला