वर्ष १९४६ ते २०१४ या काळात १ सहस्र ६७० पाद्रयांकडून ३ सहस्र ६७७ मुलांवर लैंगिक अत्याचार
|
बर्लिन (जर्मनी) – जर्मनीमध्ये कॅथॉलिक ननकडून चालवल्या जाणार्या ‘चिल्ड्रन होम’मधील अनाथ मुलांना पाद्री, राजकीय नेते आणि व्यावसायिक यांच्याकडे लैंगिक शोषणासाठी पाठवले जात होते, असे वृत्त ‘डेली मेल’ने प्रसिद्ध केले आहे. एका ६३ वर्षीय पीडित व्यक्तीने न्यायालयात याविषयीची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. ही पीडित व्यक्ती वर्ष १९६० ते १९७० या काळात या ‘चिल्ड्रन होम’मध्ये रहात होती. पीडित व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.
न्यायालयाने पीडित व्यक्तीला हानीभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ‘हानीभरपाईमधील रक्कम गेलेले जीवन पुन्हा आणू शकत नाही, जे चिल्ड्रन होममधील नन्समुळे उद्ध्वस्त झाले आहे’, असे या पीडित व्यक्तीने म्हटले. या वेळी त्या व्यक्तीने सदर चिल्ड्रन होममध्ये जो काही प्रकार चालू होता, त्याची सविस्तर माहिती दिली आहे.
अन्वेषणात मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष १९४६ ते २०१४ या काळात सुमारे १ सहस्र ६७० पाद्रयांनी ३ सहस्र ६७७ मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. मार्च १९६३ मध्ये जर्मनीतील स्पेयर शहरामधील ‘चिल्ड्रन होम’ मध्ये रहात होता. हे चिल्ड्रन होम ‘ऑर्डर ऑफ सिस्टर्स ऑफ दी डिवाईन सेव्हीअर’कडून चालवण्यात येत होते.
#Nuns pimped out boys to priests and politicians who would rape the children as other men watched at German #children‘s home, it emerges as victim wins compensation battle https://t.co/45wwRDdjNx via @MailOnline
— Washington News Line (@WashNewsLine) December 22, 2020
पीडित व्यक्तीवर १ सहस्रांहून अधिक वेळा बलात्कार !
या पीडित व्यक्तीने सदर ‘चिल्ड्रन होम’च्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. वर्ष १९६० ते १९७० या काळात ‘चिल्ड्रन होम’मध्ये तिच्यावर एक सहस्रांहून अधिक वेळा बलात्कार करण्यात आला, तसेच अनाथालयात रहाणार्या अन्य मुलांनाही ननद्वारे पाद्री आणि नेते यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जात आली होता. विरोध केल्यावर मारहाण केली जात होती. ही व्यक्ती ५ वर्षांची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते.
अनाथालायाच्या खोलीत पाद्री, राजकीय नेते यांच्याकडून हवे त्या मुलाचे लैंगिक शोषण !
न्यायालयात या पीडित व्यक्तीने सांगितले की, लैंगिक अत्याचारांसाठी मुलांना बाहेर पाठवले जात होते. तसेच ‘चिल्ड्रन होम’ मध्येही लैंगिक अत्याचार केले जात होते. अनाथालयात एक खोली होती. तेथे पाद्री, नेते आणि अन्य लोक यांच्यासमोर ७ ते १४ वर्षांच्या मुलांना पाठवले जात होते. ते हवे तेव्हा मुलांवर बलात्कार करत होते. या मुलांचे ऐकणारे तेथे कुणी नव्हते.
चिल्ड्रन होममधील नन दलालांप्रमाणे काम करत होती !
पीडित व्यक्तीने सांगितले की, चिल्ड्रन होममधील नन दलालांप्रमाणे काम करत होती. जर कुणी तिचे ऐकण्यास नकार दिला, तर त्यांना मारहाण केली जात होती. मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बदल्यात ननला पैसे मिळत होते.
नन्सकडूनही शोषण !
चिल्ड्रन होमच्या नन्सदेखील मुलांचे लैंगिक शोषण करत होत्या. वाद झाल्यानंतर वर्ष २००० मध्ये हे अनाथालय बंद करण्यात आले; मात्र त्यानंतरही लैंगिक शोषणाच्या बातम्या समोर येत होत्या.